देवगडमधील फणसे समुद्रकिनाऱ्यावर आढळला मृतदेह

मृतदेहावर शीर नसल्याने खळबळ

देवगड : देवगड तालुक्यातील फणसे येथील समुद्रकिनाऱ्यावर एका अज्ञात पुरुषाचा शीर नसलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना स्थानिकांच्या निदर्शनास आली.

मृतदेह पुरुषाचा असून त्याच्या अंगावर आकाशी रंगाचा टी-शर्ट आणि क्रीम रंगाची हाफ पँट आहे. मृतदेहाला शीर नसल्यामुळे त्याची ओळख पटवणे कठीण झाले आहे. या व्यक्तीचे वय साधारणपणे ४५ वर्षांच्या आसपास असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे.

स्थानिकांनी तात्काळ या घटनेची माहिती देवगड पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली हेड कॉन्स्टेबल आशिष कदम आणि भाऊ नाटेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो ताब्यात घेतला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!