कुडाळ : तालुक्यातील चेंदवण गावच्या माजी सरपंच व शिवसेना उबाठा गटाच्या सदस्या सौ.उत्तरा धुरी यांनी आपले सहकाऱी भालचंद्र धुरी, प्रमोद नाईक, धोंडी नाईक, उमेश नाईक, हनुमंत परब, भालचंद्र रेवणकर व प्रवीण भरडकर यांच्यासह आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायणराव राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्याने प्रभावित होऊन या सर्वांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. लवकरच चेंदवण गावामध्ये मेळावा घेऊन आपल्या अन्य सहकाऱ्यांचा मोठा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारणी सदस्य सौ.संध्या तेरसे यांनी शाल घालून व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. खासदार नारायणराव राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून चेंदवण गावासाठी भरीव निधी देण्यात येईल असे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई यांनी सांगितले. यावेळी मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, सरचिटणीस रुपेश कानडे, जिल्हा कार्यकारणी सदस्य मोहन सावंत, पप्या तवटे, महिला मोर्चा अध्यक्ष सौ.आरती पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष तन्मय वालावलकर, सुनील बांदेकर, सचिन काळप, निलेश तेंडोलकर, सौ.विशाखा कुलकर्णी, सौ. तेजस्विनी वैद्य,सौ. अक्षता कुडाळकर, चेंदवण सरपंच वैभव चेंदवणकर, उपसरपंच ऋषिकेश माधव, नारायण शृंगारे, प्रशांत तेंडोलकर, सौ.प्रणाली तेंडोलकर, सूर्यकांत शृंगारे, गोपाळ कोचरेकर व अन्य पदाधिकारी उपस्थितीत होते.

चेंदवण गावच्या माजी सरपंच व शिवसेना उबाठा गटाच्या सदस्या उत्तरा धुरी यांचा सहकाऱ्यांसह भाजपात प्रवेश
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111

Subscribe










