हिंदुत्ववादी संघटनेने घेतला आक्षेप..पालकांचा संताप
कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापूर शहराजवळील जाधववाडी येथीलप्राथमिक शाळेत आज पालकांनी गोंधळ घातला. शाळेमध्ये विद्यार्थ्यांकडून म्हटल्या जाणाऱ्या ‘ए मत कहो खुदासे’ या प्रार्थनेवर पालकांनी आक्षेप घेत शिक्षकांना जाब विचारलायं. यामुळे शाळेत बराच वेळ गोंधळ उडाला होता.कोल्हापूरच्या जाधववाडी येथे प्रिन्स शिवाजी विद्या मंदिर शाळेत ही प्राथमिक शाळा आहे. या शाळेत विद्यार्थी रोज ‘ए मत कहो खुदासे’ ही प्रार्थना म्हणत असतात. दरम्यान या प्रार्थनेमध्ये उर्दू शब्द असल्याने पालकांनी त्यावर आक्षेप घेतल्याचा प्रकार सकाळी शाळा सुरु झाल्यानंतर घडला आहे. त्यामुळे शाळेसमोर नागरिकांची गर्दी जमली होती.
पोलिसांनी केली मध्यस्थी
शाळेत पालक गोंधळ करत असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळताच शाहूपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी देखील शाळेत पोहोचले होते. त्यांनी पालकांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र पालक हे आपल्या तक्रारींवर ठाम होते. दरम्यान या प्रकाराबद्दल दोषी शिक्षकांना निलंबित करावं अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.













