शासकीय हमीभावाने भात खरेदी नोंद १५ डिसेंबर पर्यंत

दोडामार्ग सावंतवाडी तालुक्यात शेतकरी नोंदणी सुरू

शेतकऱ्यांनी त्वरित नोंद करावी सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे आवाहन

सावंतवाडी प्रतिनिधी : सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात खरेदी-विक्री संघामार्फत ९ केंद्राच्या माध्यमातून आधारभूत किंमतीत भात खरेदी करीता शेतकरी नोंदणी सुरु करण्यात आली आहे. १५ डिसेंबर पर्यंत नोंदणी करुन घ्या, असे आवाहन चेअरमन प्रमोद गावडे व व्हाईस चेअरमन रघुनाथ रेडकर यांनी केले आहे.

नोंदणी साठी आवश्यक कागदपत्र कोणते?

याकरीता शेतकऱ्यांनी चालू पीक पेरा नोंदीचा भात शेतीचा ७/१२. आधारकार्ड झेरॉक्स, आधार लिंक माबाईल नंबर असणे आवश्यक आहे व पासबुकाची झेरॉक्स, वैयक्तिक घेवून भात खरेदी केंद्रावर स्वतः हजर राहून शेतकरी नोंदणी करुन घ्यावयाची आहे.

सावंतवाडी खरेदी-विक्री संघामार्फत सावंतवाडी, मळगांव, मळेवाड, तळवडे, डेगवे, कोलगांव, मडूरा, इन्सुली व भेडशी दोडामार्ग येथे भात खरेदी केंद्रे मंजूर करण्यात आली आहेत. तरी जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करुन या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन खरेदी विक्री संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!