गांजा बाळगल्याप्रकरणी वेंगुर्ले येथे एकजण ताब्यात

वेंगुर्ले : गांजा बाळगल्याप्रकरणी वेंगुर्ले पावर हाऊसयेथे एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. सोमनाथ पुंडलिक मेणसे (वय २१, रा. मूळ बेळगाव व सध्या हरमल-गोवा) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई सकाळी ७.७५ च्या सुमारास करण्यात आली. त्याच्या कडून २६ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई वेंगुर्ला पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी केली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!