पश्चिम आणि मध्य रेल्वेवर नव्या लोकल दाखल
मुंबई प्रतिनिधी: मुंबई आणि लोकल हे समीकरण कायमच बांधल गेलेलं आहे. मुंबईच्या प्रत्येक कष्टकरी माणसाच्या दिवसाची सुरुवात आणि शेवट हा लोकलनेच होतो.दरम्यान ओढातानीचा हा प्रवास सुखकर करण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात आणखी एक एसी लोकल दाखल होणार आहे. तर, मध्य रेल्वेला एक सामान्य लोकल मिळाली आहे. चार वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पश्चिम आणि मध्य या दोन्ही मार्गांसाठी नवीन उपनगरीय ट्रेन मिळाल्या आहेत.
मंगळवारी रात्री विरार यार्डात नवीन एसी लोकल दाखल झाली आहे. आठवडाभर या लोकलची टेस्टिंग होणार आहे. त्यानंतर ही लोकल प्रवासी सेवेत दाखल होणार आहे. या नव्या लोकलमुळं पश्चिम रेल्वेच्या 10 ते 12 एसी सेवांमध्ये वाढ होणार आहे. मात्र ही गाडी जलद किंवा धिम्या मार्गावर चालवण्याचा निर्णय अद्याप झाला नाहीये. सध्या पश्चिम रेल्वेवर लोकलच्या एकूण 1406 फेऱ्या धावतात. मात्र यात आणखी वाढ झाल्यास प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेवरही नवीन लोकल दाखलपश्चिम रेल्वेबरोबरच मध्य रेल्वेवरही एक लोकल मिळाली आहे.
मध्य रेल्वेला सामान्य लोकल मिळाली
चौथा कॉरिडॉर असलेल्या बेलापूर-उरण मार्गिकेवर सुरू असलेल्या जुन्या लोकलच्या जागेवर धावणार आहे. 12 डब्यांची ही लोकल आहे. सध्या बेलापूर-उरण विभागात तीन रेट्रोफिटेड लोकल गाड्यांचा वापर केला जातो. या तीन लोकलपैकी एक गाडी बदलून त्या जागी नवी लोकल चालवली जाणार आहे.