कुडाळ : तालुक्यातील डिगस टेम्बवाडी येथील रहिवाशी भिवाजी जगन्नाथ सावंत यांच्या निवासस्थानी दिनांक 7 ऑगस्ट रोजी श्री विठ्ठल रखुमाई मूर्ती पुनः प्राणप्रतिष्ठापना सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सकाळी आठ ते दुपारी एक वाजता श्री विठ्ठल रखुमाई नूतन मूर्ती पुनः प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. दुपारी एक वाजता आरती व तीर्थप्रसाद होणार आहे. दुपारी महाप्रसाद तर संध्याकाळी चार ते सहा वाजता गीतापाठ वाचन करण्यात येणार आहे. सायंकाळी सहा वाजून 30 मिनिटांनी ते रात्र आठ वाजेपर्यंत हरिपाठ केला जाणार आहे. रात्रौ साडेआठ वाजता श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ माड्याची वाडी यांचे शुश्राव्य भजन होणार आहे. यावेळी बुवा श्री ऋषिकेश गावडे, सुप्रसिद्ध पखवाज वादक लक्ष्मण गावडे हे स्वतः उपस्थित राहणार आहेत. तरी या श्री विठ्ठल रखुमाई मूर्ती पुनः प्रतिष्ठापना सोहळ्याचा सर्व भक्तगणांनी लाभ घ्यावा असे आवाहन भिवाजी सावंत यांच्या वतीने करण्यात आले आहे.