सध्या तरी नविन प्रोग्राम नाही , निधी अभाव अडचण
अधिकाऱ्यांनी मनसेच्या शिष्टमंडळाकडे बोलून दाखवली खंत
महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिष्टमंडळा ने आज मुख्यमंत्री तथा पंतप्रधान ग्राम सडक विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय भोसले यांची भेट घेत कुडाळ मालवण तसेच वेंगुर्ला येथील ग्रामीण भागातील PMGSY , CMGSY प्रस्तावित नवीन रस्ते आणि सबंधीत विभागाच्या जुन्या रत्यावरील खड्ड्यांबाबत चर्चा करण्यात आली.
प्रामुख्याने कविलकाटे साई मंदिर रोड गणपती पुर्वी खड्डे बुजवणे आणि केरवडे तर्फ माणगाव नविन रस्ता बनवण्याची मागणी करण्यात आली.तसेच ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात मोऱ्या खचणे व खड्डे पडले आहेत तर काही रस्त्याची दुर्दशा झाली आहे. असे बरेच रस्ते ग्रामसडक योजनेच्या नविन प्रोग्रामच्या प्रतिक्षेत आहेत.
त्यामुळे तेथील स्थानिक नागरिकांना फार मोठा त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर काम झालेल्या काही रत्यावर खड्डे पडलेत आणि ते ठेकेदाराच्या जोखीम कालावधीत आहेत. त्यांचे खड्डे भरण्यात यावे. ज्या कामांचे कार्यारंभ आदेश झालेत ती काम लवकरात लवकर पुर्ण करावीत, स्थानिक ठेकेदार सिंडीकेट चेन करुन ठेके भरत नसतील तर बाहेरील ठेकेदारांना संधी द्यावी.
नविन प्रोग्राम, व निधी साठी वरीष्ठ स्तरावर पाठपुरावा, पत्रव्यवहार करावेत. अशा बर्याच विषयांची चर्चा यावेळेस करण्यात आली व निवेदन देण्यात आले. आमच्या मागण्या व चर्चे विषय गांभीर्यपूर्वक विचार करावा असे यावेळेस सांगण्यात आले..
यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज, उप जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, तालुकाध्यक्ष हेमंत जाधव, सुबोध परब, विद्यार्थी सेना अध्यक्ष यतिन माजगावकर, हेदुळ शाखाध्यक्ष सुरज पुजारे, अनिकेत ठाकूर उपस्थित होते.