कुडाळ : महसूल दिनाच्या निमित्ताने राज्यभर राबवण्यात येत असलेल्या महसूल सप्ताहाचा भाग म्हणून माननीय तहसीलदार श्री वीरसिंग वसावे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पिंगुळी मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान 2025 ग्रामपंचायत पिंगुळी येथे आयोजित करण्यात आले होते.
या उपक्रमात महसूल विभागाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली पिंगुळी मंडळ अधिकारी श्री गुरुनाथ गुरव यांनी या अभियानात नागरिकांशी संवाद साधून उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन केले.त्यावेळी कुडाळ नायब तहसीलदार मा.श्री संजय गवस साहेब यांचेही मार्गदर्शन लाभले, यावेळी पिंगुळी सरपंच मा.श्री अजय आकेरकर यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले.यासोबत ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत पिंगुळी व पिंगुळी मंडळाच्या वतीने क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल माननीय श्री गुरुनाथ गुरव यांचा शाल श्रीफळ सुपारीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्राम महसूल अधिकारी श्री विजय पास्ते, श्रीमती बिरादार,श्रीमती जाधव, श्रीमती राणे ,पोलीस पाटील सतीश माडये, वैभव धुरी, प्रशांत धुरी,बाबली पिंगुळकर, सुरजित गावडे ,सुवर्णा म्हाडदळकर यांच्यासह महसूल सेवक व पिंगुळी, मांडकुली,बिबवणे,वाडीवरवडे माणकादेवी, कुटगाव या गावांमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या अभियानांतर्गत सातबारा उतारे, फेरफार,संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांना दाखले वाटप,उत्पन्न दाखले वाटप तसेच ओळखपत्र तयार करणे, ई-पिक पाहणी संदर्भात सेवा पुरवण्यात आल्या. शासनाच्या या उपक्रमाबद्दल मंडळातील सर्व नागरिकांनी समाधान व्यक्त केले.