कुडाळ : युवासेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदी स्वरूप वाळके यांची नियुक्ती आली असून आ. निलेश राणे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. आ. निलेश राणे यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची जिल्ह्यात ओळख असून गेली अनेक वर्षे ते राजकारणास समाजकारणात सक्रिय आहेत. त्यांच्या या निवडीनंतर जिल्हाभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.