भडगाव सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडून दलीत वस्तीवर अन्याय

ग्रामस्थ संजय अंबारे १५ ऑगस्ट रोजी करणार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण

कुडाळ : भडगाव सरपंच व ग्रामसेविका यांच्याकडून दलीत वस्तीवर अन्याय होत असून दिनांक १५ ऑगस्ट रोजी या अन्यायाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे ग्रामस्थ संजय अंबारे यांनी म्हटले आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्त केले आहे.

या निवेदनात असे म्हटले आहे की, ग्रुप ग्रामपंचायत भडगाव येथील सरपंच गुणाजी लोट, ग्रामसेविका व सदस्य राजू राणे यांनी संगनमताने भडगाव खुर्द येथील दलीत वस्तीमधील काम शासनस्तरावरून निधी प्राप्त असतानाही केवळ कागदपत्रांची अपूर्तता असल्याने रद्द झाले. भडगाव सरपंच व ग्रामसेवक यांनी कोणताही पाठवपुरावा न केल्यामुळे दलीत वस्तीवरील कामासाठी मंजूर झालेला २५७८६० एवढा निधी रद्द झाला. हा विषय ग्रामसभेत आल्यानंतर त्याचा ठराव घेण्यात आला. या ग्रामपंचायतीच्या इतिवृत्ताची मागणी ग्रामसभेत केली असता ७ दिवसात इतिवृत्त देण्याचा ठराव झाला. मात्र ७ दिवसानंतर इतिवृत्त मागण्यासाठी गेले असता सरपंच व ग्रामसेवकांनी इतिवृत्त देण्यास नकार दिला. हे लोक अशाच प्रकारे आपल्या अधिकारांचा गैरवापर करून सर्वसामान्य नागरिकांना सातत्याने त्रास देत आहेत. या विरोधात दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणास करणार असल्याचे ग्रामस्थ संजय अंबारे यांनी सांगितले आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्त केले आहे.

error: Content is protected !!