विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांची माहिती
सावंतवाडी : शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या, रविवार, दिनांक २७ जुलै २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता सावंतवाडी येथील काझी शहाबुद्दीन हॉल (बस स्थानकासमोर) एक विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात सावंतवाडी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार असून, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचाही गौरव करण्यात येणार आहे.
या सोहळ्यासाठी सावंतवाडी तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, शहर प्रमुख, शहर संघटक, उपशहर प्रमुख, उपतालुका प्रमुख, उपतालुका संघटक, विभाग प्रमुख, विभागीय संघटक, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, बूथ प्रमुख, महिला आघाडी आणि युवा सेनेचे सर्व पदाधिकारी तसेच समस्त शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विधानसभाप्रमुख, सावंतवाडी, श्री. रुपेश गुरुनाथ राऊळ यांनी केले आहे.