कुडाळ : सामाजिक कार्यकर्ते आनंद शिरवलकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार दिनांक २४ जुलै २०२४ रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये भव्य रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, आयुष्यमान भारत कार्ड कॅम्प आदींचा समावेश आहे. तेव्हा जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे तसेच या उपक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन आनंद शिरवलकर मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.