खंबीरपणे पाठीशी राहण्याची दिली ग्वाही.
वेंगुर्ला : परप्रांतीय व्यक्ती आर्थिक आमिषाला बळी पडून नियमबाह्य मदत करणाऱ्या महसूलच्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची तहसीलदार वेंगुर्ला यांना मनसेने निवेदन देत मागणी केली.
शिरोडकर कुटुंबीयांस प्रशासनाकडून न्याय न मिळाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेंगुर्ला तहसीलदार कार्यालयावर उग्र आंदोलन करेल असा इशाराही मनसे वेंगुर्ला कडून देण्यात आला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दाभोली येथील शिरोडकर कुटुंबीयांची जमीन पैशांचे आमिष दाखवून तलाठी मंडळ अधिकारी यांना हाताशी धरून एका गुजराती ठक्कर परप्रांतीयाने हडप केली आहे. सदर जमीन हडप करताना परप्रांतीय ठक्कर याला पेशाने डॉक्टर असलेला स्थानिक एजंट मदत करत आहे. या डॉक्टर एजंट आणि यापूर्वी देखील अशाच प्रकारे दोडामार्ग तालुक्यातील सासोली येथील स्थानिक मराठी कुटुंबांच्या जमिनी देखील परप्रांतीयांच्या घशात घालण्यासाठी अशाच प्रकारे भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांना हाताशी धरत पैसे देऊन सावंतवाडी येथील परप्रांतीय महिलांना त्या ठिकाणी आणत जबरदस्तीने मोजणी करण्याचा प्रयत्न देखील केला होता. दोडामार्ग येथे घडलेल्या प्रकाराच्यावेळी सुद्धा दोडामार्ग पोलीस निरीक्षक म्हणून आता वेंगुर्ला येथे असलेले पी.आय ओतारी हेच त्या ठिकाणी होते ते या डॉक्टर एजंटचे सर्व कारनामे जाणून आहेत.म्हणूनच अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसीलदार वेंगुर्ला यांना लेखी निवेदन देत चुकीच्या पद्धतीने खोट्या कागदपत्रांच्या आधारे शिरोडकर कुटुंबीयांच्या सातबारा मध्ये गैर मार्गाने परप्रांतीय ठक्कर नामक व्यक्तीची झालेली नोंद रद्द करण्याची मागणी केली आहे.
यावेळी उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, मनसे तालुकाध्यक्ष सनी बागकर, शहराध्यक्ष सुरज मालवणकर, विभाग अध्यक्ष विनायक पटनायक, बंटि तांडेल आदी उपस्थित होते.