गवा रेड्याच्या धडकेत युवक गंभीर

सावंतवाडी तालुक्यातील घटना

सावंतवाडी : सावंतवाडी रेडी मार्गावरील माजगांव येथील कै. भाईसाहेब सावंत समाधीजवळ अचानक गवा रस्त्यावर येऊन दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीस्वार सागर प्रभाकर मळगांवकर (३६, रा. मळगांव आंबेडकरनगर) हा युवक गंभीर जखमी झाला. अपघातानंतर तो जाग्यावरच पडून होता. त्यानंतर स्थानिकांनी व तेथे जमलेल्या काही वाहनधारकांनी रिक्षात घालून याला उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालयीन सूत्रांनी दिली असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

error: Content is protected !!