विशाल वाडेकर यांना अटक
कुडाळ : कविलकाटे रायकरवाडी येथे ५२ हजार रुपये किमतीचा १६८० किं. ग्रॅ. गांजा जप्त करण्यात आला असून याप्रकरणी विशाल सुरेश वाडेकर याला अटक करण्यात आली असल्याची माहिती कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली. याप्रकरणी संशयीताला उद्या शनिवार ५ जुलै रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सांगितले.
आज शुक्रवार ४ जुलै रोजी कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रमोद काळसेकर यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत कविलकाटे येथे विशाल वाडेकर याने आपल्या राहत्या घरी गांजा विक्री करता आणल्याची बातमी प्राप्त झाली. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी वरिष्ठांच्या आदेशान्वये सापळा रचून आरोपी याची राहते घरी छापा टाकून आरोपी याचे ताब्यात ५२ हजार रुपये किमतीचा १६८० कि.ग्रॅ. गांजा जप्त करून ताब्यात घेतला तसेच आरोपी विशाल वाडेकर यास अटक करून ताब्यात घेण्यात आलेले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. श्री मोहन दहिकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, पोलीस अंमलदार प्रमोद काळसेकर, कृष्णा केसरकर, संजय कदम, महेश भोई, समीर बांदेकर, गणेश चव्हाण, योगेश मांजरेकर, पद्मिनी मयेकर यांनी केलेली आहे कुडाळ पोलीस ठाण्यात स्वतंत्र असे अमली पदार्थ विरोधी पथक स्थापन केले केले आहे. या पथकामार्फत अमली पदार्थांची विक्री सेवन करणाऱ्या विरोधात माहिती काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.