नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

सावंतवाडी येथील घटना

सावंतवाडी : सावंतवाडी माठेवाडा येथे नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सौ. प्रिया पराग चव्हाण (३३) असे तिचे नाव आहे. ती सासू – सासऱ्यांसोबत फ्लॅटमध्ये राहत होती. तर नवरा पुणे येथे नोकरीला आहे. या ठिकाणी पोलिस दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू होते. तर आत्महत्येचे कारण अजून समजू शकले नाही.

error: Content is protected !!