पुराच्या पाण्यात वाहून वृद्धाचा मृत्यू

वैभववाडी तालुक्यातील घटना

शेतात नदी ओलांडून जात असताना घडली घटना

वैभववाडी : शेतात जात असताना नदीला आलेल्या पुरात वाहून वृध्दाचा दुर्दैवी अंत झाला आहे. भास्कर रामचंद्र सरफरे वय ७९ रा. करूळ जामदारवाडी असे त्या वृद्धाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले.

मयत भास्कर सरफरे हे शेतात काम करण्यासाठी जात होते. ते आपल्या शेतात नदी ओलांडून जात होते. पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्याच्या प्रवाहात वाहत गेले. प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी घडलेल्या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांना दिली. सह्याद्री जीव रक्षक ही घटनास्थळी दाखल झाले. वाहुन गेलेल्या ठिकाणापासून ५० मीटर अंतरावर नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला. स्थानिकांनी त्यांचा मृतदेह नदीपात्रा बाहेर काढला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर घटनास्थळी दाखल झाले. त्याचबरोबर पोलीस नाईक उद्धव साबळे, अजय बिलपे, सुरज पाटील, योगिता जाधव, जितेंद्र कोलते, दीपेश पानसे आदी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सह्याद्री जीव रक्षकचे अध्यक्ष हेमंत पाटील राजेंद्र वारंग व इतर सदस्य घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थ सत्यवान सरफरे, दिलीप सरफरे, रवींद्र सरफरे, सुरज शिंदे, बबन टक्के, दत्ताराम सरफरे, विष्णू सरफरे, अशोक सरफरे, श्रीधर चव्हाण, रेखा सरफरे, दिपाली जामदार आदी घटनास्थळी दाखल झाले. सरपंच नरेंद्र कोलते, माजी सरपंच रमेश पांचाळ, तलाठी नागेश्वर रामोड, पोलीस पाटील सचिन पाटील, उदय कदम आदी घटनास्थळी उपस्थित होते. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. मयत भास्कर सरफरे यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली, भाऊ, भावजय, सुना व नातवंडे असा परिवार आहे. या घटनेचा अधिक तपास वैभववाडी पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!