कॉलेजला जात असता अज्ञातांनी केला हल्ला
धारगळः म्हापसा, धारगळ येथे सोमवारी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. सकाळी कॉलेजसाठी निघालेल्या वृषभ शेट्ये (वय. १७) यांच्यावर काही अज्ञात माणसांकडून अॅसिड अटॅक करण्यात आला. हा हल्ला एवढा भयावह होता की १६ वर्षीय मुलाचं ९०% शरीर यात जळलं असून त्याला तातडीने उपचारांसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं आहे.
कुठे झाला हल्ला?
माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी कॉलेजला जाण्यासाठी थांबलेल्या मुलावर दोन मोटारसायकल चालकांनी अचानक अॅसिड हल्ला केला. या हल्ल्यात वृषभ शेट्येनामक पीडित मुलाची एक बाजू पूर्णपणे जळली आहे. हल्ल्यानंतर तो मदतीसाठी बराचवेळ मागणी करत होता मात्र कुणीही त्याच्या मदतीला धावून आलं नाही.
शेवटी एका माणसाने दया दाखवत वृषभ शेट्येला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. सध्या पोलीस या घटनेचा पंचनामा करत असून घडलेल्या हा धक्कादायक प्रकार पेडणे तालुक्यात पहिल्यांदाच घडला असल्याने स्थानिक यावर चिंता व्यक्त करत आहेत.
वृषभ शेट्ये कोण?
वृषभ शेट्ये हा कुठल्या किंवा कुठल्या कॉलेजचा विद्यार्थी आहे याचा अजून अंदाज आलेला नाही. मात्र तो मदतीसाठी बराच वेळ याचना करत राहिला तरीही कोणी त्याला मदत केली नाही. हा विद्यार्थी नेमका कुठला हे माहिती नसलं तरीही तो धारगळचा रहिवासी असल्याची शक्यता आहे. रस्त्यावर किंवा चेक नाक्यांवर असलेले सीसीटीव्ही कॅमेरा चांगल्या स्थितीत नाहीत त्यामुळे सरकारने त्वरित याकडे लक्ष देत नागरिकांच्या सुरक्षेसाठी ही यंत्रणा तपासून घ्यावीत आणि पीडितेला ज्ञाय द्यावा अशी मागणी होतेय.













