कणकवली : शहरातील पत्रकार कॉलनीनजिक असलेल्या एका विहिरी जवळ गेले दोन महिने टिविएस कंपनीची ( एमएच ०२ ईजे ४४२३ ) क्रमांकाची ज्युपिटर दुचाकी उभी आहे. याबाबत आजुबाजूला देखील चर्चा आहेत. येथील काही स्थानिकांनी याबाबत कणकवली पोलिसांचे लक्ष वेधले होते. मात्र पोलिसांकडून देखील याबाबत काही ठोस पाऊले उचलली गेली नाहीत. सदर दुचाकी कोणी अशी पार्किंग करून दोन महिने कसा जाऊ शकतो ? ती दुचाकी चोरी ची तर नसेल ना ? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत. याबाबत पोलिसांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. सदरची दुचाकी जर चोरीची असेल तर ती त्या मालकाला मिळण्यास यानिमित्ताने मदत होऊ शकते.