बांदा : गाव मौजे निगुडे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर 2 इमारत स्लॅबची असून वर्ग खोलीमध्ये विद्यार्थी बसत होते. स्लॅब मधलं लोखंड जीर्ण झालेला आहे आणि त्यातून काही भाग खाली पडत आहे. त्यामुळे संतप्त पालकांनी विद्यार्थ्यांना त्या वर्गात बसू नका अशी मागणी शिक्षकांकडे केली. त्यानंतर रोनापाल माजी उपसरपंच भिकाजी केणी यांनी सदर शाळा नादुरुस्त असल्याबाबतची कल्पना निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांना दिली तात्काळ सदर शाळेची पाहणी केली असता अत्यंत भयानक परिस्थिती त्या वर्ग खोल्यांची आहे. यासंदर्भात गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती श्रीमती कल्पना बोडके व जिल्हा परिषद उपअभियंता श्री अंगद शेळके यांच्याशी संपर्क साधून यासंदर्भात शाळेने वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. परंतु त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे सदर शाळेची तात्काळ दखल घेऊन सर्वप्रथम काम मार्गी लावा असे गवंडे यांनी सांगितले. अन्यथा ती शाळा निर्लेखित करा सदर शाळा दोन इमारती असून आता एकूण विद्यार्थी 14 आहेत दुसऱ्या इमारतीमधील विद्यार्थी आता एकाच वर्गामध्ये बसत आहे इयत्ता चौथी पर्यंत ही शाळा आहे. परंतु सन २०२३- २४ व २०२४-२५ वर्षी ही वर्गखोली दुरुस्ती करण्यासंदर्भात शाळेचे शिक्षक श्री मेस्त्री यांनी संबंधित गटशिक्षणाधिकारी यांना पत्र व्यवहार केलेला आहे. परंतु त्याची दखल घेतलेली नाही त्यामुळे शाळा तात्काळ दुरुस्त करा अन्यथा ती निर्लेखित करा असा इशाराही माजी उपसरपंच गुरूदास गवंडे यांनी प्रशासनाला दिलेला आहे. शासनाकडे इमारत बांधायला पैसे कदाचित नसतील म्हणून आज या शाळांची अवस्था अशी आहे. परंतु हिंदी भाषा लागण्याचे काम हे सरकार पहिलीपासून चौथीच्या विद्यार्थ्यापर्यंत करत आहे. इमारती दुरुस्ती करण्यासंदर्भात कोणताही निधी यांच्याकडे उपलब्ध नाही. कारण, आज जिल्हा नियोजन मध्ये 60 टक्के निधी या ठिकाणी स्थानिक आमदार आणि राहिलेले दोन उपमुख्यमंत्री यांच्या कार्यकर्त्यांना 20 / 20 टक्के रक्कम कामासाठी देत आहे. त्यामुळे काम करायची तरी कोणी हा प्रश्न येथील कार्यकर्त्यांना पडलेला आहे. याचं काम घ्यायचं की त्याचं काम घ्यायचं त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन सदर शाळेची देखभाल दुरुस्ती करावी. अन्यथा विद्यार्थ्यांना घेऊन जिल्हा प्रशासनाच्या आवारामध्ये आम्ही बसू असा इशाराही त्यांनी दिला.

निगुडे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं.२ नादुरुस्त तात्काळ दुरुस्त करा माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांची मागणी
1
/
100
माजी खासदार विनायक राऊत यांच्या विरोधात कुडाळात निदर्शने #kudal #vinayakraut
नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत भव्य चित्रकला स्पर्धा संपन्न #kankavli
गुणवत्ता हि आजच्या काळातील खरी संपत्ती - नगराध्यक्ष संदेश पारकर #kankavli #sandeshparkar
कणकवलीच्या विकासासाठी योग्य तो निर्णय घेणार | संदेश पारकर एक्सक्लुझिव्ह मुलाखत | वाढदिवस विशेष
कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकरयांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत #kankavli #sindhudurg
कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा भावी खासदार म्हणुन उल्लेख.... #kankavli #sindhudurg
संदेश पारकर यांच्या वाढदिवसाचे उपक्रम म्हणजे कलेची नांदी - प्रसाद राणे #kankavli #sandeshparkar
लवकरच सर्व कर्मचाऱ्यांना कामाचे लेखी आदेश दिले जातील #kudal #sindhudurg
आम्हाला ३-४ महिने पगार मिळत नाही #kudal #sindhudurg
संदेश पारकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार - सुशांत नाईक #kankavli #sindhudurg
हिंमत असेल तर अंकुश जाधव यांनी मोर्चा काढून दाखवावा - संदीप कदम #sindhudurg
वेताळ बांबर्डे (कदमवाडी) येथे विहिरीत पडला बिबट्या
1
/
100

Subscribe










