ऐन निवडणुकीच्या काळात कोकणातील आरपीआयचा बडा नेता नॉट रिचेबल

सिंधुदुर्ग : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) कोकणातील एक बडे नेते म्हणून ओळखले जाणारे रतनभाऊ कदम ऐन निवडणुकीच्या काळात नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे निवडणुकीत ते नेमकी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

रतनभाऊ कदम हे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. गेली अनेक वर्षे ते आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व करत आहेत. त्यामुळे आंबेडकरी जनता मोठ्या संख्येने त्यांच्याशी जोडली गेली आहे. ऐन निवडणुकीच्या काळात ते नॉट रिचेबल राहिल्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

केंद्रात आणि राज्यात आरपीआय महायुतीसोबत आहे. परंतु कोकणातील आरपीआयचा बडा नेता म्हणून ओळखले जाणारे रतनभाऊ कदम ऐन निवडणुकीच्या काळात नॉट रिचेबल असल्यामुळे निवडणुकीमध्ये ते भाजपला पाठिंबा देणार की वेगळा धमाका करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *