युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे उद्या आचरा येथे होणार जंगी स्वागत

मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे उद्या रविवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी ३ वाजता त्यांचे आचरा येथे आगमन होणार असून यावेळी मालवण तालुका युवासेना व शिवसेना आचरा यांच्या वतीने आचरा बाजारपेठ येथे आदित्य ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी शिवसेना,युवासेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन युवासेना मालवण तालुका समन्वयक मंदार ओरसकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *