बांदा भाजप व प्रमोद कामत मित्रमंडळाचे आयोजन
बांदा : प्रतिनिधी
कर्णबधीर मतिमंद विद्यार्थ्यांचे निवासी विद्यालय चालविणे आर्थिकदृष्ट्या कठीण आहे. शासकीय अनुदान मिळत नसल्याने संस्थेला मोठ्या आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागते. माऊली महिला मंडळ, शिरोडा संस्थेने हे शिवधनुष्य लीलया पेलले आहे. भविष्यात या संस्थेला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे अभिवचन माजी जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत यांनी दिले.
माऊली महिला मंडळ शिरोडा संचलित कोंडुरा येथील माऊली कर्णबधिर निवासी विद्यालयात राज्याचे बंदरे व मत्स्योद्योग मंत्री ना. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बांदा भाजप व प्रमोद कामत मित्रमंडळातर्फे मुलांना खाऊ व कपडे खरेदीसाठी १० हजार रुपयांची मदत देण्यात आली. तसेच विद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस जावेद खतीब यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यालयाच्या गरजा ओळखून आवश्यक मदत देण्यात येईल, असे सांगितले. यावेळी पंचायत समिती माजी उपसभापती संदीप नेमळेकर, वाफोली सरपंच उमेश शिरोडकर, उपसरपंच विनेश गवस, माजी बांदा मंडळ अध्यक्ष महेश धुरी, मधुकर देसाई, अशोक सावंत, दीपक सावंत, विलास पावसकर, संजय नाईक, ज्ञानदीप राऊळ, ज्ञानेश्वर सावंत, सिद्धेश कांबळी, आत्माराम गावडे, निलेश नाटेकर आदी उपस्थित होते.