आचरा येथे उपअभियंता,सहाय्यक अभियंता व लाईनमन यांची नेमणूक करण्याची कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांची शिवसेना पदाधिकाऱ्यांना ग्वाही
आचरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज कणकवली येथे महावितरणचे कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांची भेट घेऊन आचरा विभागातील विज समस्या सोडवण्याची मागणी केली. त्याचबरोबर आचरा विद्युत सबस्टेशन येथे उपअभियंता,सहाय्यक अभियंता व लाईनमन पदे भरण्याची सूचना करण्यात आली त्यावर सौरभ माळी यांनी चार दिवसात उपअभियंता व सहाय्यक अभियंता नेमण्याचे तसेच दोन दिवसात लाईनमनची नेमणूक करण्याचे आश्वासन शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिले तसेच वारंवार खंडित होणारा वीज प्रवाह सुरळीत व्हावा यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची ग्वाही श्री माळी यांनी दिली.
आचरा विभागातील विविध विज समस्यांमुळे नागरिक त्रस्त असल्याने आचरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महावितरणचे कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांची भेट घेऊन विज समस्या मार्गी न लागल्यास २४ जून रोजी आचरा तिठा येथे रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. त्याबाबतचे निवेदनही कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले. याची गंभीर दखल घेऊन कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांनी आचरा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या सर्व समस्या मार्गी लावण्याची ग्वाही दिली आहे. तसेच आंदोलन न करण्याची विनंती त्यांनी केली. त्यानुसार आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
आचरा येथे वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्यामध्ये विद्युत वाहिन्यांवरील झाडांची कटिंग करणे, घरांवरील धोकादायक विद्युत वाहिन्या शिफ्टिंग करणे, जीर्ण पोल, विद्युत वाहिन्या बदलणे,आचरा विद्युत सब स्टेशन येथे उपअभियंता, सहाय्यक अभियंता व लाईनमन यांची नेमणूक करणे,आउट सोर्स कर्मचारी भरण्याचे आश्वासन सौरभ माळी यांनी दिले आहे.
यावेळी शिवसेना आचरा विभागप्रमुख समीर लब्दे, विभाग संघटक मंगेश टेमकर, विभाग संघटक पप्पू परुळेकर, उपविभाग प्रमुख सचिन रेडकर,उपविभाग प्रमुख अनिल गावकर ,आचरा महिला विभाग प्रमुख अनुष्का गावकर, पळसंब उपसरपंच अविराज परब, आचरा शहर प्रमुख माणिक राणे, युवासेना प्रमुख विद्यानंद परब, माजी सरपंच श्यामसुंदर घाडी, ग्रा.प. सदस्या पूर्वा तारी, मच्छीमार नेते नारायण कुबल, अर्चन पांगे, परेश तारी, नंदू कांबळी, सचिन बागवे, श्रीकांत बागवे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
1
/
111
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
1
/
111


Subscribe










