ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे उपसरपंच नवलराज काळे यांनी भर पावसामध्ये अधिकारी कॉन्ट्रॅक्टर यांच्या समवेत जनतेला सोबत घेऊन वैभववाडी सडूरे मुख्य रस्त्याच्या कामाची केली पाहणी.

लोकप्रतिनिधी प्रशासन व जनता या समीकरणातून काढला तोडगा ग्रामपंचायत कार्यालय येथे झाली बैठक

उर्वरित कामे पूर्ण न झाल्यास जनतेसोबत लोकशाही मार्गाचा अवलंब करणार उपसरपंच नवलराज काळे यांनी दिला संबंधित अधिकारी यांना इशारा

सडूरे मुख्य रस्ता चालू असलेल्या कामातील काही त्रुटी होत्या या पार्श्वभूमीवर उपसरपंच नवलराज काळे यांच्या पुढाकारातून संबंधित अधिकारी कॉन्ट्रॅक्टर गावचे लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत ही सभा आयोजित करण्यात आली होती. सभा झाल्यानंतर संपूर्ण रस्त्याची पाहणी करण्यात आली यामध्ये गावठाण येथील काँक्रिटीकरणाच्या लगत काँक्रीटीकरणाचे गटार मारणे त्यासाठी लागणारी जागा संबंधित ग्रामस्थांशी चर्चा करून उपलब्ध करण्यात आली. ग्रामस्थांचे होणारे नुकसान कॉन्ट्रॅक्टरने व्यवस्थित करून द्यावे अशा अटी वरती ग्रामस्थांनी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच काही ठिकाणी पाईपलाईन काही ठिकाणी संरक्षण भिंत याबाबत देखील सूचना आधी दिल्या होत्या तीही काम अपूर्ण होती त्याबद्दल देखील आज उपसरपंच नवलराज काळे व उपस्थित ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांची कान उघडणि केली आणि लवकरात लवकर हे काम होण्यासाठी प्रयत्नशील रहावे अशा सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आल्या.

तसं न झाल्यास नवलराज काळे जनतेच्या पाठीमागे ठामपणे उभे राहील गावचा लोकप्रतिनिधी या नात्याने काम न झाल्यास लोकशाही मार्गाचा अवलंब करण्याचा इशारा देखील उपसरपंच नवलराज काळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला.


राणेवाडी येथे चालू असलेल्या कामाच्या वरील पाणी वस्ती येते त्यामुळे भविष्यात केलेला रस्त्याला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो त्या अनुषंगाने आताच उपाययोजना करणे गरजेचे आहे लोकप्रतिनिधी म्हणून स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करून आपल्याला पाण्याचा निचरा करण्यासाठी लागणारी जागा उपलब्ध करून देण्याची आम्ही घेऊ त्यांच्याशी चर्चा करून जमीन उपलब्ध करू परंतु ते काम होण्यासाठी आपण प्रयत्नशील राहावे भविष्यात हे काम आपल्याला करावे लागेल अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना नवलराज काळे यांनी दिल्या. तसेच सध्या चालू असलेले रस्त्याचे काम पूर्ण करून चतुर्थी आधी मागाववाडी पासून राणेवाडी चव्हाणवाडी हा रोड उत्तम दर्जाचा व्हावा वाहतुकीस योग्य राहावा यासाठी प्रयत्नशील राहावे असे देखील काळे यांनी सांगितले.


यावेळी डेप्युटी इंजिनियर श्री भोसले, व इंजिनियर पुरी, कॉन्ट्रॅक्टर विखाळे,सरपंच दीपक चव्हाण, उपसरपंच नवलराज काळे,ग्राम अधिकारी प्रशांत जाधव,ग्रामपंचायत सदस्य रोशनी बाणे, ग्रामपंचायत सदस्य विलास जंगम, माजी तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल काटे, माजी पोलीस पाटील प्रकाश रावराणे, दिपक भावे,दिलीप भाबर, प्रभाकर राणे, दिलीप राणे,बंटी राणे,अनिता आंगणे,सुनीता पवार,रवींद्र गुरव किशोर गुरव,संतोष सुतार, बाळा सुतार,राजेंद्र भाबर, रामदास भाबर,दशरथ पडवळ,सागर मेजारी मुकेश सुतार, हनुमंत सुतार व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संबंधित मुंबई येथे स्थित असलेले जमीन मालक यांच्याशी स्वतः नवलराज काळे व्हिडिओ कॉल द्वारे संवाद साधला श्री विठ्ठल काटे यांनी हा संवाद घडवून आणला व या ठिकाणी काही अडचणी होत्या त्या दूर करण्यासाठी केलेली शिष्टाई यशस्वी झाली. अंतिमरीत्या कॉन्ट्रॅक्टरला काही सूचना देत पोलीस पाटील प्रकाशराव राणे यांच्या घरापासून ते आंगणे यांच्या बाजूला असलेल्या ओढ्यापर्यंतचे गटर काँक्रिटीकरण करण्याचे फायनल ठरवण्यात आले. पावसाचं वातावरण कमी झाल्यानंतर लगेच कामाला सुरुवात करू असे कॉन्ट्रॅक्टरने संबंधित अधिकाऱ्यांच्या समोर ग्रामस्थांना वचन दिले. इतर किरकोळ कामांबाबत सकारात्मक चर्चा होऊन लवकरात लवकर ती कामे पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करू असे कॉन्ट्रॅक्टरने अधिकाऱ्यांसोबत सर्वांना आश्वासित केले.


लोकप्रतिनिधी या नात्याने झालेली चर्चा आणि चर्चेत सांगितलेली कामे पूर्ण न झाल्यास जनतेसोबत घेऊन लोकशाही मार्गाचा अवलंब केला जाईल असा इशारा उपस्थित उपसरपंच नवलराज काळे यांनीग्रामस्थांच्या वतीने अधिकाऱ्यांना इशारा दिलेला आहे. परंतु लोकशाही मार्गाचा अवलंब करावा लागणार नाही अशा प्रकारे आपण काम कराल अशी अशा देखील काळे यांनी व्यक्त केली आहे.


कॉन्ट्रॅक्टर कडून काम करून घेण्याची जबाबदारी ही सर्वस्वी संबंधित अधिकाऱ्यांची राहील असे देखील श्री नवलराज काळे यांनी या ठिकाणी सांगितले. आज झालेल्या आढावा बैठकीचा निश्चितपणे जनतेला फायदा होईल आणि उर्वरित कामे पूर्ण होतील असा विश्वास जनतेतून व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!