‘संकल्प सेवेचा’ या उपक्रमाअंतर्गत प्रिन्सिपल वामनराव महाडिक विद्यालय तळेरे येथील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले सदरचा उपक्रम तळेरे हायस्कूलच्या पूर्व विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीव जागृती व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सदर उपक्रमाचे आयोजन केले. दहावी इयत्तेमध्ये शिकणाऱ्या सहा गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.तळेरे हायस्कूल मधील पूर्व विद्यार्थ्यांनी या सहायता उपक्रमाचे आयोजन केले.
१-कु. रक्षा रविंद्र भोगले
२-कु. सलोनी सुरेश तोरसकर
३-कु. रवि राजेंद्र बोडेकर
४-कु. वैजयंती विजय जंगले
५-कु. स्नेहा गोविंद सुतार
६-कु. प्रियांका प्रकाश शिंगे
या कार्यक्रमात सहाय्यक शिक्षक श्री. विनायक टाकळे श्री. संतोष जठार (सदस्य-स्थानिक शाळा व्यवस्थापन समिती) श्री. मिनेश तळेकर (सचिव-स्व. सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालय तळेरे) कर्मचारी श्री. देवेंद्र तळेकर श्री. संदेश तळेकर श्री. साईप्रसाद वानोळे आदी उपस्थित होते. या उपक्रमाचे समन्वयक श्री मिनेश तळेकर व श्री रवींद्र चिके यांनी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक, मान्यवर यांचे आभार व्यक्त केले. सातत्याने दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात सहाय्य करण्यासाठी समन्वयक श्री मिनेश तळेकर यांचे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले.














 
	

 Subscribe
Subscribe









