Category वेंगुर्ला

आडेली येथे जीवे मारण्याचा प्रयत्न…

कुडाळ न्यायालयातने दिली १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी वेंगुर्ला : काकी व चुलत बहिणीस जीवंत मारण्याचा प्रयत्न करणा-या बाळकृष्ण कुबल याला मंगळवारी कुडाळ न्यायालयात हजर केले असता त्याला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठवण्यात आली आहे. आडेली-गावठाणवाडी येथे सामाईक जमिनीच्या वादातून सख्ख्या…

वेंगुर्ले – कुडाळ मार्गावर वाडीवरावडे येथे मध्यरात्री स्विफ्ट कारला अपघात

वेंगुर्ले कुडाळ मार्गावर वाडीवरावडे येथे मध्यरात्री स्विफ्ट कारला अपघात झाला सदर गाडी वेंगुर्लेहून कुडाळच्या दिशेने जात होती असे दिसून येते. MH07AU1900 या स्विफ्ट गाडीची धडक तेथील स्ट्रीट लाईटच्या खांबाला बसून खांब तुटून पडला त्यामुळे स्ट्रीट लाईट देखील खंडित झाली आहे…

महिलेचा पाठलाग केल्याप्रकरणी उपसरपंचावर गुन्हा दाखल

विवाहित महिलेचा छुपा पाठलाग करून तिच्याशी संपर्क करण्याचा तसेच वैयक्तिक ओळख वाढविण्यासाठी तिच्या मोबाईलवर ऑनलाईन असतेवेळी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी निवती – मेढा उपसरपंच गोविंद विठोबा जाधव (35 ) याच्यावर निवती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना शुक्रवारी…

वेंगुर्लेतील मेडिकल कॉलेजच्या तिघा विद्यार्थ्यांना बेदम मारहाण…

थेट सोलापुरातून माणसं आणून जबर मारहाण सकाळी मारहाण करून दिवसभर ठेवलं नजर कैदेत वेंगुर्ले : किरकोळ कारणावरून वेंगुर्ले येथील मेडिकल कॉलेजच्या तिघा विद्यार्थ्यांना सोलापूर येथील तरुणांच्या जमावाकडून मारहाण करण्यात आली. यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना काल…

“राधाकृष्ण चषक २०२५” या सांगितिक महोत्सवाअंतर्गत ‘शास्त्रीय गायन स्पर्धा(हिंदुस्थानी ख्याल)’ व ‘सवेष साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा’

‘श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग’ या संस्थेच्या वतीने व ‘स्वयंभू कला क्रीडा मंडळ, आजगांव’ यांच्या सहकार्याने आयोजन वेंगुर्ला : जिल्ह्यातील शास्त्रीय संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या ‘श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग’ या संस्थेच्या वतीने व ‘स्वयंभू कला क्रीडा मंडळ, आजगांव’ यांच्या…

वेंगुर्ला येथे भव्य बहुप्रजातीय मत्स्य बीज उत्पादन केंद्र उभारणीला शासनाची मंजुरी

मत्स्योद्योग मंत्री ना. नितेश राणे यांच्या प्रयत्नाला यश प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील मौजे – वाघेश्वर (उभादांडा) येथे तब्बल रु. २२ कोटी २३…

सिताराम संजीवनी आनंदाश्रम निवती येथे विविध बचत गटातील महिलांचा सत्कार

वेंगुर्ला : म्हापण येथील सीताराम संजीवनी आश्रमाला कोचरा येथील विविध अश्रमांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्यांच्या या अनमोल मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी यासाठी आश्रमाच्या मुख्य परिचारिका सानिका तुळसकर यांच्या संकल्पनेतून सन्मानाचा एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.…

शिरोड्यात अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणाऱ्या तृतीयपंथींना ग्रामस्थांकडून चोप

वेंगुर्ले : शिरोडा बाजारपेठेसह आजूबाजूच्या परिसरात फिरून अर्वाच्य भाषा वापरून जबरदस्तीने पैसे मागणाऱ्या पाच तृतीयपंथींना ग्रामस्थांनी यथेच्छ चोप देऊन गावातून हाकलून लावले. ही घटना रविवारी दुपारी घडली. पाचही दारुच्या नशेत होते. ग्रामस्थांनी पोलिसांच्या सहाय्याने त्यांना गावातून पळवून लावले. शिरोडा येथील…

३ वर्षांच्या बालकाचा ओहोळात बुडून मृत्यू

परुळे येथील घटना वेंगुर्ला : परुळे कुशेवाडा देऊळवाडी येथील तीन वर्षीय कु. भूपेश निलेश परुळेकर या बालकाचा आज शनिवारी ओहोळाच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. परुळे कुशेवाडा देऊळवाडी येथे परुळेकर यांचे घर…

रेडी समुद्रकिनारी आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह

वेंगुर्ले: रेडी घंगाळेश्वर देवस्थानच्या बाजूला असलेल्या रेडी पोर्ट ऑफिसच्या मागील बाजूला समुद्रातील खडकामध्ये एक अनोळखी ३० वर्षीय महिलेचामृतदेह शुक्रवारी सायंकाळी आढळून आला आहे.आकस्मित मृत्यू म्हणून पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी याच समुद्रकिनारी एका अनोळखी ४० वर्षीयपुरुषाचा…

error: Content is protected !!