Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या १८ वर्षीय तरुणाचा नदीत बुडून मृत्यू

मालवण : गौरी-गणपतीच्या सणासाठी मुंबईहून गावी आलेल्या १८ वर्षीय तरुणाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मालवण तालुक्यातील हिवाळे धुरीवाडी येथील देवकोंड परिसरात शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. यश अनंत धुरी असे मृत तरुणाचे नाव आहे. यश हा नालासोपारा, मुंबई येथे…

पाण्याची टाकी साफ करताना गांधीलमाशांचा हल्ला

महेश साळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू मालवण : घरासमोरील पाण्याची टाकी साफ करत असताना गांधीलमाशांनी केलेल्या अचानक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या साळकरवाडी येथील वाचनालय कर्मचारी महेश बळीराम साळकर (३८) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने साळकरवाडी तसेच कांदळगाव परिसरात हळहळ व्यक्त…

मालवण हादरले! सावत्र बापानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

मालवण तालुक्यात अल्पवयीन मुलीवर सावत्र वडिलांकडून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप समोर आला आहे. आचरा पोलिसांनी POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून संशयिताला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

कुडाळ रेल्वे स्थानकावर आरोग्य शिबिरांसह सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

१९ सप्टेंबरला फिझिओथेरपी शिबीर तर २०-२१ ला सांस्कृतिक कार्यक्रम गणेशोत्सवाचे औचित्य कुडाळ : गणेश चतुर्थी उत्सवानिमित्त कुडाळ रेल्वे स्थानकावर प्रवाशांसह नागरिकांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १९ ते २१ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आरोग्य शिबिरे तसेच सांस्कृतिक कार्यक्रम…

तुतारी एक्सप्रेसच्या धडकेत २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू

कुडाळ रेल्वे स्थानक परिसरातील घटना कुडाळ : कुडाळ रेल्वे स्थानक परिसरात गुरुवारी दुपारी घडलेल्या दुर्घटनेत तुतारी एक्स्प्रेसची धडक बसून २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. रघुवीर छोटूलाल भिल (रा. बारा, राजस्थान) असे मृताचे नाव आहे. रेल्वे मार्गावर त्याचा मृतदेह आढळून आल्यानंतर…

गणेशोत्सवासाठी आंबेरी येथे आलेला इसम बुडाला

कर्ली नदीत होडी उलटल्याने घडली दुर्घटना मालवण : गणेशोत्सवासाठी आंबेरी-वाकवाडी येथील सासरवाडीला आलेल्या मुंबईतील दर्शन चंद्रकांत टकारिया (मूळ रा. गुजरात) यांचा कर्ली नदीत होडी उलटून झालेल्या दुर्घटनेनंतर शोध सुरू होता. अखेर दुर्घटनास्थळापासून सुमारे १०० ते १५० मीटर अंतरावर त्यांचा मृतदेह…

हॉटेल व्यावसायिकावर दगडाने हल्ला

मोटारसायकल न दिल्याचा राग मारहाणीत उजव्या गुडघ्याखालील हाड मोडले कळसुली-गांगोसखलवाडी येथील घटना कणकवली : कळसुली – गांगोसखलवाडी येथे मोटारसायकल न दिल्याच्या रागातून शेजाऱ्याने हॉटेल व्यावसायिकाला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी जमिनीवर…

🪔 कुसबेत ‘मोदीमय’ वातावरण!

भाजपा ओबीसी मोर्चातर्फे आमदार प्रमोद जठार यांचा सन्मान कुडाळ तालुक्यातील कुसबे गावात भाजपा ओबीसी मोर्चा, ओरोस मंडल यांच्या वतीने आमदार प्रमोद जठार यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दीप प्रज्वलित करून, देशसेवेचा हा दीप सदैव तेवत…

अध्यात्म हे समाजाला संस्कार, एकोपा आणि सकारात्मक ऊर्जा देणारे महत्त्वाचे क्षेत्र – विशाल परब.

काशीकल्याणी ब्राह्मण मंदिराच्या नूतन प्रवेशद्वाराचे युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते भूमिपूजन!, आध्यात्मिक वारशाला विकासाची नवी दारे! वेंगुर्ला : तालुक्यातील आरवली-बागकरवाडी येथील काशीकल्याणी ब्राह्मण मंदिराच्या नूतन प्रवेशद्वाराच्या बांधकामाचा शुभारंभ भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते भूमिपूजनाने करण्यात आला. धार्मिक…

सकस आहारातून ॲनिमियावर मात करू – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

महिला व बाल रुग्णालयात ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत पोषण व ॲनिमिया जनजागृती कार्यक्रम संपन्न कुडाळ : पोषण आणि ॲनिमिया जनजागृती हा विषय मुली व महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेकदा घर आणि कामाच्या व्यापात महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, ज्याचा थेट…

error: Content is protected !!