Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

आंबोलीतील प्रसिद्ध हिरण्यकेशी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा

आंबोली: आंबोली येथील एक प्रमुख धार्मिक आणि पर्यटनस्थळ असलेल्या हिरण्यकेशी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या रस्त्यामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः केंद्र आणि राज्यात भाजपचे हिंदू समर्थक सरकार असतानाही, धार्मिक…

बांदा बाजारपेठेत जादूटोण्याचा प्रकार

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बांदा शहराच्या मुख्य बाजारपेठेत, गांधी चौकात अघोरी कृत्य केल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्यावर टाचण्या टोचलेले लिंबू, नारळ, हळद आणि कुंकू ठेवलेले आढळले. आज सकाळी दुकाने उघडणाऱ्या व्यापाऱ्यांनी हे दृश्य पाहिल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली…

आकेरी येथे एस. टी. बस कलंडली

कुडाळ : सावंतवाडीहून कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या पणजी- सोलापूर या बसला आज सकाळी साडेआठच्या सुमारास आकेरी येथे कलंडली. अचानक ब्रेक दाबल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.…

युवा सेनेचे स्वानंद उपाध्ये यांनी दिल्या संदेश नाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

कुडाळ : युवा सेनेचे स्वानंद ऋषिकेश उपाध्ये यांनी कुडाळचे माजी पंचायत समिती सदस्य तथा युवासेना उपजिल्हाप्रमुख संदेश नाईक यांची वाढदिवसाच्या निमित्ताने भेट घेतली. यावेळी उपाध्ये यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन नाईक यांना शुभेच्छा दिल्या.

हुमरमळा वालावल गावातील गुरांना लम्पी आजार उपाय योजना म्हणुन लसिकरण.!

शिवसेनेचे अतुल बंगे व सरपंच श्री अमृत देसाई यांचा पुढाकार! ९० जनावरांना लसिकरण पशुधन पर्यवेक्षक श्री सज्जन यांनी केले लसिकरण! कुडाळ : हूमरमळा वालावल गावातील शेतकऱ्यांच्या गाई आणि बैलांना लम्पी आजाराची लागण होऊ नये म्हणून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे…

मंत्री नितेश राणे शनिवार 2 ऑगस्ट रोजी ओम गणेश निवासस्थानी जनतेसाठी असणार उपलब्ध

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे शनिवार 2 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी ते सकाळी 10 वाजल्यापासून जनतेसाठी उपलब्ध राहणार आहेत.दुपारी 4 वाजता कणकवली नगरपंचायती करिता सर्व सोयी सुविधायुक्त, स्वयंचलित व…

गट शिक्षण अधिकारी कार्यालय पंचायत समिती मालवण येथे 15 ऑगस्ट रोजी उपोषण

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नांदरुख येथे कमी शिक्षक संख्या असल्याने ग्रामस्थ पालकांचा निर्णय मालवण : तालुक्यातील एक मोठे व प्रसिद्ध असलेले गाव म्हणजे नांदरुख, या गावात ८-९ वाड्या असून या सर्व वाड्यांसाठी असलेली एकमेद शाळा म्हणजे जि. प. पु.…

दशावतारातील बालगंधर्व म्‍हणून ओळखले जाणारे प्रशांत मेस्‍त्री यांचे विजेच्या धक्क्याने निधन

अंत्ययात्रा उद्या शनिवार 2ऑगस्ट रोजी सकाळी 9- 30 वाजता निघेल कणकवली : दशावतार नाट्यकलेत आपल्या उत्कृष्ट स्त्री भूमिकांसाठी ओळखले जाणारे आणि ‘दशावतारातील बालगंधर्व’ म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ कलाकार प्रशांत रामचंद्र मेस्त्री (वय ५०, रा. हरकुळ खुर्द सुतारवाडी) यांचे विजेच्या धक्क्याने…

मुंबई – गोवा महामार्गावर टँकर पलटी

टँकर मधून डिझेल गळती होत असल्याची स्थानिकांची माहिती झाराप – पत्रादेवी बायपासवर मळगाव येथे टँकरचा अपघात झाला आहे. या अपघातात मळगाव रेडकरवाडीलगत असलेल्या मूर्ती सिमेंट प्लांट नजीक टँकर पलटी झाला आहे. मुंबई – गोवा महामार्गावर सध्या अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणावर…

कलमठ ग्रामपंचायतच्या स्वच्छता जागराला उत्स्फूर्त प्रतिसाद

घरोघरी केला जातोय स्वच्छ कलमठ संकल्प प्रचार सरपंच संदीप मेस्त्री स्वतः सहभागी कणकवली : कलमठ गावात स्वच्छता जागराला ग्रामस्थांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून. पहिल्याच दिवशी नव्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. कलमठ येथे १ ऑगस्ट पासून कचरा संकलन नव्या नियमात…

error: Content is protected !!