अंत्ययात्रा उद्या शनिवार 2ऑगस्ट रोजी सकाळी 9- 30 वाजता निघेल
कणकवली : दशावतार नाट्यकलेत आपल्या उत्कृष्ट स्त्री भूमिकांसाठी ओळखले जाणारे आणि ‘दशावतारातील बालगंधर्व’ म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ कलाकार प्रशांत रामचंद्र मेस्त्री (वय ५०, रा. हरकुळ खुर्द सुतारवाडी) यांचे विजेच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने दशावतार कला क्षेत्रात शोककळा पसरली असून, सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त होत आहे.
गेली अनेक वर्षे प्रशांत मेस्त्री यांनी दशावतार रंगभूमीवर आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. त्यांच्या निधनाने दशावतार कलेची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले आणि वडील असा परिवार आहे.
दशावतारातील स्त्री भूमिकांना त्यांनी एक वेगळी उंची प्राप्त करून दिली होती. त्यामुळे दशावतारप्रेमींमध्ये ते विशेष लोकप्रिय होते. त्यांच्या अचानक जाण्याने एका उत्कृष्ट कलाकाराला आपण मुकलो, अशा भावना अनेकजण व्यक्त करत आहेत.
प्रशांत मेस्त्री यांची अंत्ययात्रा शनिवार, २ ऑगस्ट रोजी सकाळी ९:३० वाजता त्यांच्या हरकुळ खुर्द येथील राहत्या घरातून निघेल.


Subscribe









