कुडाळ : सावंतवाडीहून कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या पणजी- सोलापूर या बसला आज सकाळी साडेआठच्या सुमारास आकेरी येथे कलंडली. अचानक ब्रेक दाबल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, नेहमीप्रमाणे सावंतवाडी आगाराची बस प्रवाशांना घेऊन कुडाळकडे जात होती. आकेरीच्या वळणावर अचानक काहीतरी समोर आल्याने चालकाने तात्काळ ब्रेक दाबला. यामुळे बसवरील ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. अपघातानंतर लगेचच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले