कालच सरंबळ इंग्लिश स्कूल सरंबळ, तालुका कुडाळ.
या प्रशालेच्या 2013-14 च्या बॅच चा अनोखा (get together) स्नेहमेळावा पडला. त्या दिवशी पार्टी किवा कुठेही फिरायला न जाता जमलेल्या रकमेतून शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना वह्या , पेन आणि कंपास बॉक्स दिला.प्रशालेचे मुख्याध्यापक प्रा श्री होळकर सर तसेच सहकारी शिक्षक श्री संदीप परब, श्री संतप्रसाद परब उपस्थितीत होते. त्यांनी ही या संकल्पनेच कौतुक करत सर्वाना शुभेच्छा दिल्या.. आताची दहावीची बॅच ही उपस्थित होती.
सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यात प्रशालेचे 2013-14 चे माजी विद्यार्थी ॲड स्नेहा परब, नलेश टेमकर, प्रफुल्ल परब, ऋषिकेश गावकर,तुकाराम कदम, शुभम सुतार, निखिल गोसावी, अक्षय जाडे, अनुज राऊत, ओंकार चेंदवणकर, उर्वी करलकर,अलका शेलटे,कोमल नाईक, सुषमा साटम,सजेली वाराडकर,रसिका हळदणकर, उपस्थित होते.