शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाच्या मागणीची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल
कृषीयांत्रिकीकरणा अंतर्गत लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांना कृषी अवजारांचे, ठिबक सिंचनचे वाटप केले जात आहे. मात्र त्यात अडथळा ठरत असलेली फार्मर आयडी कार्डची अट काही काळ शिथिल करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेऊन फार्मर आयडी कार्डची अट काही काळ शिथिल करण्याची कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी पुणे कृषी आयुक्तालय येथील कृषी आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला आहे.
कृषीयांत्रिकीकरणा अंतर्गत शेतकऱ्यांना कृषी अवजारांचे, ठिबक सिंचनचे वाटप लॉटरी पद्धतीने केले जात आहे. मात्र त्यात निवड झालेल्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी कार्डची अट ठेवण्यात आली आहे. अनेक शेतकऱ्यांनी दोन महिन्यापूर्वी फार्मर आयडी कार्ड काढूनही अद्याप त्यांना फार्मर आयडीकार्ड मिळालेले नाही. आता शेतीचा हंगाम सुरु झाल्यामुळे लॉटरी पद्धतीत निवड झालेल्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी कार्डची अट काही काळ शिथिल करून कृषी अवजारांचे वाटप करण्यात यावे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी कृषी अवजारांसाठी अर्ज केले आहेत त्या सर्वांना कृषी अवजारे मिळण्यासाठी कृषीयांत्रिकीकरण योजनेची व्याप्ती वाढवावी. अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली,माजी आमदार परशुराम उपरकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी ४ जून रोजी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे केली होती. त्या मागणीवर कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी कृषी आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला आहे.
जिल्हाधिकारी यांनी पत्रात म्हटले आहे कि, महाडीबीटी संगणक प्रणालीवरील प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना (PMKSY), वैयक्तिक शेततळे योजना, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान (SMAM), एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (MIDH) इ. योजनेतून निवड झालेल्या शेतकऱ्यांना महा. डी. बी. टी. पोर्टलवर लॉगीन करण्यासाठी फार्मर आयडीचा वापर सुरु झालेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी राजन तेली माजी आमदार, परशुराम उपरकर माजी आमदार, वैभव नाईक माजी आमदार, सुशांत नाईक जिल्हाप्रमुख युवासेना आणि सतीश सावंत कणकवली विधानसभा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी याबाबत निवेदन दिलेले असून अनेक शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळालेला नसल्याचे नमूद केले आहे. आता खरीप हंगाम सुरु झाला असल्यामुळे निवड झालेल्या शेतकऱ्यांना महा. डी. बी. टी. पोर्टलवर लॉगीन करण्यासाठी फार्मर आयडी वापराची अट काही काळासाठी शिथिल करून शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देणेबाबत कळविलेले आहे. तरी कृपया याबाबत उचित कार्यवाही होण्यासाठी विनंती आहे असे पत्रात म्हटले आहे.
1
/
69
सावंतवाडीच्या नगराध्यक्षा म्हणून सीमाताई मठकर १००१ % विजयी होणार - विनायक राऊत | Vinayak Raut
स्वाभिमानी कामगार संघटना, सिंधुदुर्ग आयोजित स्वस्त दरात घरेलु वस्तूंचे वितरण
अवतरली तारका गाण्याच्या सहकलाकारांशी संवाद #sindhudurg #kudal
नृत्य आशिष प्रोडक्शन प्रस्तुत "अवतरली तारका" सर्वांच्या भेटीला #dikshanaik #ashishpatil #kudal
उपनगराध्यक्ष असताना मंदार शिरसाट यांनी प्रकल्पाला विरोध का केला नाही? #kudal #sindhudurg
मंदार शिरसाट, किरण शिंदे यांची सत्ता असताना प्रकल्पाला विरोध का नाही केला? #kudal #sindhudurg
दोन्ही मुलांमध्ये विसंगती वाढू नये म्हणून राणे साहेबांना युती पाहिजे – सतीश सावंत #satishsawant
भाजपच्या कार्यकर्त्यांना नारायण राणे शिंदेंच्या शिवसेनेकडे पाठवत आहेत - वैभव नाईक | Vaibhav Naik
मालवण तालुक्यात एका गावात जत्रोत्सवात रंगला पत्त्यांचा डाव #sindhudurg #malvan #kudal
मी असेपर्यंत राणे कुटुंबात अंतर्गत वाद होणार नाही - नारायण राणे | Narayan Rane #narayanrane
शिवसेना उबाठा सत्तेतल्या कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही - वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhavnaik
भाजप आणि शिवसेना हे दोन स्वतंत्र पक्ष - राजन तेली #kankavali #rajanteli
1
/
69

Subscribe









