सिंधुदर्पण इम्पॅक्ट; अवघ्या काही तासात वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणची टीम दाखल

२५ दिवसांपासून वीजपुरवठा होता बंद

बांदा : रोणापाल गावातील वीजपुरवठा गेले २५ दिवस बंद असल्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले होते. सिंधुदर्पण न्युज चॅनेलच्या माध्यमातून याबाबतचे वृत्त प्रसारित करताच महावितरण ताबडतोब ऍक्शन मोडवर आले असून महावितरणची टीम या ठिकाणी दाखल झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रोणापाल गावातील वीजपुरवठा गेले २५ दिवस बंद असून यावर कारवाई करताना दिरंगाई केली जात होती. याबाबत विचारणा केली असता वायरमनकडून थातूर मातुर उत्तरे मिळत होती. सिंधुदर्पण न्युज चॅनेलवर याबाबतचे वृत्त प्रसारित करताच महावितरणने याची ताबडतोब दखल घेतली. सिंधू दर्पण न्यूज चॅनेलवर वृत्त प्रसारित केल्यापासून अवघ्या काही तासांच्या आत महावितरण ॲक्शन मोडवर आले असून महावितरण ची टीम रोणापाल या गावात दाखल झाली आहे. यामुळे रोणापाल गावातील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

error: Content is protected !!