मुंबई गोवा महामार्गावर मळगाव येथे अपघात

अपघातात डंपरची मागची चाके तुटली

टेम्पो ट्रॅव्हलरच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा

सावंतवाडी : गुजरात येथून गोव्याच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या डंपरच्या मागील बाजूस धडक दिल्याने गुजरात येथील टेम्पो ट्रॅव्हलर च्या दर्शनी भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या अपघातात टेम्पो ट्रॅव्हलर चालकासह एक प्रवासी गंभीर तर अनेक जण जखमी झाले.

मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवर मळगाव जोशी मांजरेकरवाडी येथे हा अपघात झाला. अपघातानंतर स्थानिक रहिवासी संजय जोशी, विद्याधर मांजरेकर दीपक जोशी व अन्य ग्रामस्थांनी टेम्पो ट्रॅव्हलर चालकासह अन्य जखमींना सुरक्षितपणे बाहेर काढत त्यांना उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यातील टेम्पो ट्रॅव्हलर चालक व अनेक प्रवासी गंभीर जखमी असून इतर प्रवासी देखील किरकोळ जखमी झाले आहेत. तर या अपघातात डंपरच्या मागील बाजूची दोन्ही चाके तुटून बाहेर गेली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

error: Content is protected !!