कणकवली : भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे, सावडाव ग्रामपंचायत उपसरपंच भाजप नेते दत्ता काटे यांच्या उपस्थितीत धनगर समाजाने आमदार नितेश राणे यांची भेट घेतली. यावेळी समाजाच्या समस्या आमदार नितेश राणे यांनी ऐकून घेतल्या व त्या सोडवण्यासाठी काटीबद्ध असल्याचे सांगितले.
दत्ता काटे व नवलराज काळे यांनी आपल्याला दिलेले आश्वासन हे मीच दिलेल आश्वासन आहे असं समजून ते मी पूर्ण करेन असा शब्द नितेश राणे यांनी धनगर समाजाला दिला.यावेळी उपस्थित असणाऱ्या सर्व धनगर समाज बांधवांनी या निवडणुकीत नितेश राणे यांना मतदान करण्याचे जाहीर केले. व समाजाचा पाठिंबा असल्याबबतचे स्पष्ट केले. यावेळी आमदार नितेश राणे, भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे, सावडाव उपसरपंच भाजप नेते दत्ता काटे, तालुका उपाध्यक्ष श्री.सावंत, भाजप भटके विमुक्त आघाडी कणकवली तालुका अध्यक्ष सुरेश जंगले, शक्ती केंद्रप्रमुख राजू हेर्लेकर परशुराम झगडे, पुजारे व नारायण पटकारे, यांच्यासहित धनगर समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.