छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५१ व्या राज्याभिषेक दिनानिमित्त रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर

अखिल भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्ग व एसएसपीएम लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे यांचे आयोजन

कुडाळ : श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५१व्या राज्याभिषेक दिनानिमित्त अखिल भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्ग व एसएसपीएम लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ६ जून रोजी मराठा समाज हॉल, कुडाळ येथे रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात मोफत उपचार आणि मोफत औषधे देण्यात येणार आहेत. हे शिबिर सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.

या आरोग्य शिबिरात हृदयविकार, नेत्र तपासणी, यूरोलॉजी, अस्थीरोग, जनरल सर्जरी, न्यूरोलॉजी, कर्करोग, दंतरोग, प्रसूतीशास्त्र व स्त्रीरोग आदी मोफत तपासण्या करण्यात येणार आहेत. याशिवाय, मोफत औषधे आणि गरजू रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रियाही करण्यात येणार आहेत, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. तसेच, बीसीजी, बीएचएल आणि बोन डिसेज यांसारख्या तपासण्यांची सुविधाही उपलब्ध आहे.

या उपक्रमात भाग घेऊन रक्तदान करून व आरोग्य तपासणी करून छत्रपती शिवरायांच्या कार्याला वंदन करण्याची संधी सर्व नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. सुहास सावंत यांनी केले आहे.


अधिक माहितीसाठी:
संतोष परब – ९४२०२०९८५४
शैलेश घोगळे – ९८९०००२६८४

error: Content is protected !!