डबक्यात बुडून तरुणाचा मृत्यू

कुडाळ येथील घटना

कुडाळ : घरामागील डबक्यात कपडे धुण्यासाठी गेले असता, तोल जाऊन डबक्यात पडून आत्माराम शशिकांत राऊळ (३१, रा. नेरुर-कविलगाव) यांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची खबर त्यांची आई शुभांगी राऊळ (६०, रा. नेरुर-कविलगाव) यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली.

आत्माराम राऊळ पत्नी तसेच दोन मुली यांच्यासह कुडाळ नाबरवाडी येथे राहत होते. ते गवंडीकाम करून आपला उदरनिर्वाह करायचे. नेरुर-कविलगाव येथे त्यांचे आई-वडील भाड्याने राहतात. चार दिवसांपूर्वी ते कबिलगाव येथे आपल्या आईकडे राहण्यासाठी आले होते. त्यांना आकडी येण्याची सवय होती. मंगळवारी सकाळी त्यांची आई नेहमीप्रमाणे आपली घरातील कामे आटोपून पावणेआठ वाजता दुसरीकडे कामाला गेली. वडील घरातच होते. त्यानंतर आत्माराम् सकाळी दहा वाजण्याच्या सुमारासे स्वतःचे कपडे धुण्यासाठी घराच्या पाठिमागे असलेल्या डबक्यात गेले होते.

त्यावेळी तेथे ते पडलेला अवस्थेत शेजारील व्यक्तीला दिसले. घराच्या समोरच असलेल्या वडिलांना हे समजल्यानंतर त्यांनी त्याठिकाणी येऊन पाहिले. तेव्हा आत्माराम हालचाल करीत नव्हते. ते मृत झाल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती मिळताच कुडाळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी तेथे भेट दिली. हवालदार कृष्णा परुळेकर व सुबोध मळगावकर यांनी घटनास्थळी पंचनामा केला. अधिक तपास हवालदार सचिन गवस करीत आहेत.

error: Content is protected !!