देवगड : हिंदळे भंडारवाडी येथील बेपत्ता असलेले अरुण साबाजी सावंत (५७) यांचा मृतदेह गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास तेथील ‘भवानीचे कड’ या भागातील समुद्रकिनारी खडकात कुजलेल्या स्थितीत आढळला. ते २३ मेपासून बेपत्ता होते. या घटनेची नोंद देवगड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ मे रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास अरुण सावंत हे पत्नीला आपण ‘हिंदळे सडेवाडी येथील आप्पा रामचंद्र सडेकर हे मयत झाल्याने त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी जातो’ असे सांगूनं घरातून निघून गेले होते. उशिरापर्यंत शोध घेऊनही न सापडल्याने ते बेपत्ता असल्याची फिर्याद त्यांचा मुलगा नितीन सावंत यांनी पोलीस ठाण्यात दिली होती. दरम्यान, सात दिवसांनी गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह गावातील ‘भवानीचे कड’ या भागातील समुद्रकिनारी कुजलेल्या स्थितीत आढळला. पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक महेश देसाई करत आहेत.

देवगड येथे सापडला प्रौढाचा मृतदेह
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111

Subscribe










