कणकवली – मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे हे शुक्रवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा शुक्रवारी असलेला नियोजिय दौरा पुढीलप्रमाणे आहे.
सकाळी ०८.३० वा. अधीश निवासस्थान, जुहू, मुंबई येथून मुंबई विमानतळाकडे प्रयाण, सकाळी ०८.४५ वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे आगमन व राखीव सकाळी ०९.१५ वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून इंडिगो (६ ई-६०५७) विमानाने गोव्याकडे प्रयाण, सकाळी १०.३० वा. मनोहर आंतराष्ट्रीय विमानतळ, गोवा येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण, सकाळी ११.३० वा. भाजपा युवा मोर्चाच्या मेळाव्यास प्रहार भवन, कणकवली येथे उपस्थिती, सकाळी १२.३० वा. अशोक लेलँड शोरुमच्या उद्घाटनास उपस्थिती, दुपारी ०२.३० वा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १० वी व १२ वी मध्ये यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा व “मा. मुख्यमंत्री यांचा १०० दिवस सुधारणा कार्यक्रम” यशस्वी केलेल्या अधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभास उपस्थिती, दुपारी ०३.३० वा. कोर्ले सांतडी प्रकल्पाच्या बैठकीस उपस्थिती, सिंधूनगररी, सायं. ०५.०० वा. वाभवे-वैभववाडी नगरपंचायत कार्यालयास भेट, असे मत्स्य व्यवसाय व बंदरेविकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या संपर्क कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.













