कुडाळ : अखील भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्गच्या वतीने अलीकडेच अनुकंपा तत्वावर बोगस पध्दतीने नेमणूक झालेले मुळचे बिड जिल्ह्यातील सध्या अव्वल कारकून (कुळ वहीवाट शाखा), तहसील कार्यालय, कणकवली म्हणून कार्यरत असलेले श्री. संभाजी खाडे यांच्या विरुध्द कारवाई करा अश्या आशयाचे निवेदन देण्यात आले होते. मात्र सदर निवेदन देवून सुध्दा जिल्हाधीकारी कार्यालयामार्फत महासंघाला कोणत्या स्वरूपाची कार्यवाही सुरु आहे किंवा कसे याबाबत काहीही कळवीण्यात आले नाही. महासंघाने जिल्हाधीकारी यांना दिलेल्या निवेदनात खाडे याच्या विरुध्द कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिलेला होता. सदर आंदोलनाचा पुढील भाग म्हणून महासंघाचे कुडाळ तालूकाध्यक्ष श्री. संताष दशरथ परब यांच्या वतीने आज सिंधुदुर्ग नगरी पोलीस ठाण्यात संभाजी खाडे व ज्या जिल्हाधीकारी यांनी खाडे याच्या नेमणूकीच्या आदेशावर सही केली ते दिनकर कदम यांचे विरोधात त्यांनी संगनमताने बनावट दस्तऐवज तयार करून श्री. खाडे याला गैरफायदा मिळवून दिलेला आहे व त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र शासनाचे नुकसान केलेले आहे. अशा आशयाची फिर्याद दिली. सदरची फिर्याद ही सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याने भारतीय नागरी सुरक्षा सहींता कलम 173 (3) प्रमाणे प्रार्थमीक चौकशी करीता घेतली. सदर कायदयाप्रमाणे चौदा दिवसाचे आत जर तक्रारदार यास सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याकडून काहीही कळवीण्यात आले नाही तर तक्रारदार याच्या वतीने महासंघाचे मार्फत न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे. सदरची तक्रार देताना तक्रारदार संतोष परब यांच्या सोबत महासंघाचे जिल्हाध्यक्ष अॅड. सुहास सावंत, सचीव श्री. वैभव जाधव, श्री. तानाजी सावंत, श्री. भाई राणे, श्री. जनार्दन सराफदार श्री. नितीन हरमळकर, वगैरे महासंघाचे कार्यकर्ते हजर होते.
मराठा महासंघाच्या वतीने संभाजी खाडे व तत्कालीन निवासी जिल्हाधीकारी दिनकर कदम यांचे विरुध्द तक्रार दाखल
1
/
103
उद्धव साहेबांनी बाळासाहेबांचे विचार सोडले
आमची सगळी टीम सकारात्मकतेने काम करतेय - निलेश राणे |Nilesh Rane #nileshrane
महाराष्ट्र सरकारचा मच्छीमारांच्या भविष्यासाठी ऐतिहासिक निर्णय #niteshrane
खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा #niteshrane
पंतप्रधानांना देशाच्या भविष्याची सर्वात जास्त काळजी - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
पंतप्रधानांच्या पात्रतेविषयी बोलून त्यांचा केलेला अवमान सहन करणार नाही - प्रभाकर सावंत
विरोधी पक्षाकडे चेहराच राहीलेला नाही म्हणून त्यांना "झुरळाचा" चेहरा घ्यावा लागला - आमदार प्रमोद जठार
NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ वेंगुर्ल्यात आंदोलन #vengurla #sindhudurg
एखादी मोठी कंपनी कोकणात आली नाही तर तरुणांच्या हाताला काम कसं मिळणार ?
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताह - अबिद नाईक #kankavli #ajitpawar
1
/
103

Subscribe










