पहेलगाम मध्ये घडलेल्या आतंकी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने “ऑपरेशन सिंदूर” च्या रूपाने ज्या पद्धतीने पाकिस्तान मध्ये घुसून बदललेल्या भारताचे नवभारताचे जे चित्र पाकिस्तानला आणि जगाला दाखवून दिलं आहे.
ये नया भारत है घर मे घुसेगाव भी और मारेगा भी या उक्ती प्रमाणे भारताचे कणखर नेतृत्व भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने आपल्या सैन्य दलाचे आधुनिकीकरण केले आहे ज्या पद्धतीने त्यांचे अधिकार आणि दहशतवादाविरोधी कारवाई करण्याची खुली सूट दिलेली आहे. त्यामुळे आपलं सैन्य दल किती प्रगत आहे याची कल्पना पूर्ण जगाला आलेली आहे ज्या पद्धतीने आपल्या सैन्य दलाने १०० पेक्षा जास्त आतंकवाद्यांना मारून दहशतवाद्यांची ठिकाणे नाहीशी करून पाकिस्तान चा खरा चेहरा जगासमोर उघडा करून पहेलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे त्या बद्दल सैन्य दलाचे मनोबल वाढविण्यासाठी कुडाळमध्ये आज देश प्रेमी नागरिकांच्या वतीने “तिरंगा यात्रा” करण्यात आली.
ही यात्रा राजमाता जिजाऊ चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक अशी काढण्यात आली.
या यात्रेत सौ अदिती सावंत, सौ आरती पाटील, सौ संध्या तेरसे, सौ विशाखा कुलकर्णी, सौ प्रज्ञा राणे, माजी नगराध्यक्ष सौ आफरीन करोल, माजी नगराध्यक्ष सौ अक्षता खटावकर, सौ श्रेया गवंडे, सौ सायली जळवी, सौ मुक्ती परब, सौ तेजस्विनी वैद्य, सौ चैत्राली पाटील, सौ अंजली वालावलकर सौ अंजली मुतालिक, कुमारी आस्था सावंत, सौ अक्षता कुडाळकर, रमा नाईक, बंड्या सावंत, संजय वेंगुर्लेकर, राजू राऊळ, डॉक्टर अभय सावंत, वैद्य सुविनय दामले, द्वारकानाथ घुर्ये, श्री बबन घुर्ये, प्रसाद शिरसाठ, निलेश परब, राजू बक्षी, प्रख्यात काणेकर, भोलानाथ कोचरे, के एल फाटक, संजय भोगटे, स्वरूप वाळके, अविनाश पाटील अन्वय मुतालिक, विवेक मुतालिक, चंदू पटेल, जयंती पटेल, जयवंत बिडये, राजू पाटणकर, भाई म्हापनकर, समीर सावंत, अनंत गावकर, रमेश राणे, उदय आहेर , विवेक बोभाटे, काशिनाथ निकम, सडवेलकर व देशप्रेमी नागरिक उपस्थित होते.