रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास विभागाच्या आढावा बैठकीस सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात उत्स्फूर्त प्रतिसाद

सिंधुदुर्ग : मा. भरतशेठ गोगावले (मंत्री, रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास, महाराष्ट्र राज्य) यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीस आमदार दीपकभाई केसरकर, जिल्हाधिकारी मा. अनिल पाटील, शिवसेना उपनेते संजय आंग्रे,जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, मा. संजू परब तसेच रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास विभागांचे सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीमध्ये खालील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा व निर्णय घेण्यात आले:

  1. रोजगार हमी योजना अंतर्गत जिल्ह्यात अधिकाधिक नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नविन योजना राबविणे व निधीचा प्रभावी वापर करणे.
  2. फलोत्पादन विभागामार्फत शेतकऱ्यांना पारंपारिक आणि आधुनिक पद्धतींच्या माध्यमातून फळबाग लागवडीसाठी मार्गदर्शन करणे, तसेच शासनाच्या विविध अनुदानित योजनांची माहिती सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे.
  3. खारभूमी विकास विभागाच्या कामांचा सविस्तर आढावा घेऊन, तांत्रिक व भौगोलिक अडचणी दूर करून कामांमध्ये गती निर्माण करणे.

मा. मंत्री भरतशेठ गोगावले यांनी स्पष्टपणे सांगितले की, “शासनाच्या विविध योजना जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. शेतकरी, शेतमजूर, युवक यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवण्यासाठी शासन कटीबद्ध आहे.”

तसेच त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, “प्रत्येक योजना केवळ कागदावर न राहता, तिचा प्रत्यक्ष परिणाम नागरिकांच्या जीवनावर दिसून यावा, यासाठी जबाबदारीने कार्य करणे आवश्यक आहे.”

या बैठकीत विविध प्रलंबित विषयांवरही चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले असून, लवकरच त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात येईल. उपस्थित सर्व मान्यवरांनी खात्यांच्या उपक्रमांसाठी सहकार्याची हमी दिली.

error: Content is protected !!