कणकवली : कणकवली शहरातील पमाज सिटी सेंटर च्या बाजूच्या चिकन मटण सेंटरवर खरेदीला आलेल्या गिऱ्हाईकने मटण विक्रेत्याचा मोबाईलच चोरून नेल्याची घटना रविवार 25 मे रोजी घडली. ही घटना सीसीटीव्ही मध्ये सुद्धा रेकॉर्ड झाली आहे. रविवार म्हटले की खवय्यांचा चिकन मटणाचा बेत ठरलेलाच असतो. चिकन सोबतच काही खवय्ये कलेजी पेठा, कोंबड्यांचे पाय सुदधा खरेदी करतात. 25 मे रोजी दुपारी सव्वा दोन ते अडीच वाजण्याच्या दरम्यान आलेल्या एका गिऱ्हाईकने कोंबड्यांचे पाय खरेदी केले. दरम्यान कोणाचेही लक्ष नाही हे हेरून त्या गिऱ्हाईकाने कोणाच्याही नकळत मटण विक्रेत्याचा मोबाईल चोरून आपल्या खिशात घालत निघून गेला. काही वेळाने मटण विक्रेत्याने आपला मोबाईल शोधला असता त्याला सापडून आला नाही. लागलीच दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता गिऱ्हाईक म्हणून आलेल्या व्यक्तीनेच मोबाईल चोरी केल्याचे दिसून आले. त्यानंतर त्या मटण विक्रेत्याने कणकवली पोलीस ठाणेही गाठले. मोबाईल हँडसेट चोरीचा तक्रार अर्जही पोलीस ठाण्यात दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

गिर्हाईक म्हणून आला आणि मोबाईल चोरून नेला
1
/
105
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg #sindhudurg
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg
आम्ही आमच्या देशाची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
1
/
105

Subscribe










