हळवल येथील वीस वर्षीय युवकाचा आकस्मिक मृत्यू

कणकवली : तालुक्यातील हळवल भाकरवाडी येथील उदय सचिन ठाकूर (वय २०) याचे गुरुवारी आकस्मिक निधन झाले. उदयच्या निधनाची वार्ता समजताच संपूर्ण गाव हळहळला. उदय हा गुरुवारी दुपारी राहत्या घरी आई, वडील, बहीण, आजीसोबत हसत-खेळत अभ्यास करत बसला होता. दरम्यान त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागलं. तातडीने त्याला कणकवली येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अलीकडेच काही महिन्यांपूर्वी उदयच्या काकांचे निधन झाले होते. त्या दुःखातून सावरत असताना उदयच्या निधनाने ठाकूर कुटूंबियांना आणखी धक्का बसला आहे. बारावी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उदय हा बीएस्सी अॅग्रीकल्चर कोर्स शिकत होता. उदयच्या पश्चात आई, वडील, बहीण, आजी, दोन विवाहित आत्या असा परिवार आहे. हळवल ग्रामपंचायतीचे सदस्य सचिन ठाकूर यांचा तो मुलगा होय.

error: Content is protected !!