कुडाळ : कुडाळ शहराला पाणीपुरवठा करणारी पाण्याची मुख्य लाइन फुटल्यामुळे कुडाळ शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. ही पाईपलाईन दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.
कुडाळचे नगरसेवक अभिषेक गावडे यांनी पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची समस्या लक्षात घेऊन स्वखर्चाने पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली. तसेच वॉर्ड क्रमांक ५ मध्ये कुडाळेश्वर वाडी व छत्रपती शिवाजी नगर टँकरमार्फत पाणीपुरवठा केला.