झाडाला एसटी अडकल्याने मोठा अपघात टळला : प्रवासी सुखरूप
चिंदर सडेवाडी येथील भूमिगत वीज वाहिन्यासाठी केलेल्या कामाच्या ठिकाणी घटना
आचरा : चिंदर सडेवाडी मार्गावरून जाणरी मालवण विजयदुर्ग एस् टी बस रस्त्याच्या बाजूला चिखलमय भागात चाके रुतून कलंडली. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
सविस्तर बातमी अशी कि सकाळी मालवण आगार येथून सुटणारी गाडी नं म्हणून MH 07 C-7424 मालवण आचरा हिंदळे विजयदुर्ग एसटी बस वायंगणी फाट्याच्या पुढे सडेवाडी येथे आली असता. समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देत असताना भूमीगत विद्युत वाहिनीसाठी खोदकाम करून पुन्हा योग्य पद्धतीने पूर्ववत न झालेल्या भागात डाव्या बाजूला कलंडली. सुदैवाने तोडलेल्या वटवृक्षाच्या भागाला लागून राहिल्यामुळे आधार मिळाल्याने मोठ्या अपघात पासून एसटी कलंडली. सर्व प्रवाश्याना पर्यायी वाहनाने त्यांना मार्गस्थ करण्यात आले. एसटी बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न एसटी प्रशासन कडून सुरू होते