ब्युरो न्यूज: सध्या अवकाळी पावसानं बळीराजाला चांगलेच सतावले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार अवकाळी पावसाचा मुक्काम अजून 3-4 दिवस राहणार आहे. या काळात राज्यात मुसळधार पाऊसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांना यलो व रेड अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोकणात मुसळधार बसरणार
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढचे 48 तास धोक्याचे आहेत. कोकणाला रेड अलर्ट देण्यात आला असून तेथे मुसळधार तर काही भागांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईमध्ये सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पुण्यातही जोरदार पावसानं हजेरी लावली. पुढचे दोन दिवस पुणे व मुंबईला यलो अलर्ट देण्यात आला आहे.