हुमरमळा (वालावल) गावातील महीला बचत गटांची चळवळ म्हणजे महीलां स्वावलंबी होण्याचे आदर्श काम,,,, जिल्हा बॅंक अध्यक्ष मनिश दळवी!

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनिश दळवी यांचा हुमरमळा वालावल गावातील महीला बचतगटांच्या मानपत्र देऊन सन्मानित.!


प्रतिनिधी : अर्चना बंगे यांच्या पुढाकाराने हुमरमळा वालावल गावातील महीलांनी बचत गटांची चळवळ उभारुन एक प्रकारे क्रांतीच केली आहे म्हणूनच सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे अशा कार्यतत्पर बचत गटांना कायमच सहकार्य लाभेल असे गौरवोद्गार सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी केले
आज हुमरमळा वालावल गावच्या माजी सरपंच सौ अर्चना बंगे यांच्या पुढाकाराने जिल्हा बॅंक अध्यक्ष श्री दळवी यांचा गावातील महीला बचत गटांच्या वतीने शाल श्रीफळ व मानपत्र देऊन अॅड रीना राजेश पडते व सौ अर्चना बंगे, श्री अतुल बंगे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.


यावेळी बोलताना श्री दळवी म्हणाले जिल्हा बॅंक ही महीला बचत गटांच्या उन्नतीसाठी कायम काम करीत आली आहे परंतु हुमरमळा वालावल गावातील सौ अर्चना बंगे यांच्या मार्गदर्शनाखाली बचत गटांची चळवळ मोठी उभी राहुन प्रत्येक महीला काहीना काही छोट्या मोठ्या व्यवसायात गुंतलेली दीसत आहे अशाच स्वरुपात जिल्ह्यातील महीला बचत गटांचे काम सुरू असुन सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक कायमच पाठीशी असल्याचे श्री दळवी यांनी सांगितले
यावेळी श्री दळवी बोलताना पुढे म्हणाले जिल्हा बॅंकेची प्रगतीकडे वाटचाल ही सर्व संचालक, उपाध्यक्ष, कर्मचारी व ग्राहक यांच्या सर्वांच्या सहकार्यातुन सुरु असुन बॅंकेला मिळालेले पुरस्कार यात मि मात्र निमित्त असुन यात जिल्हा वासियांचे सहकार्य आहे असेही श्री दळवी यांनी सांगुन खासदार नारायण राणे व पालकमंत्री ना नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी घौडदौड सुरू असल्याचे विशेष उल्लेख केला. यावेळी अतुल बंगे, अॅड रीना राजेश पडते, सौ अर्चना बंगे उपस्थित होते

error: Content is protected !!